Click Here...👇👇👇

10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्राजवळील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवणार #chandrapur #Nagpur #Mumbai

Bhairav Diwase

वाचा काय आहे नवे नियम


मुंबई:- दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अनेक नियमांमध्ये यंदा बदल करण्यात आले आहेत. यासोबतच फसवणूक मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आले आहेत.

राज्य मंडळाच्या दहावी व बारावी परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्राजनजीक असणारी झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षेत कोणताही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे.

कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी बोर्डाकडून विशेष काळजी

१) वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार नाही.

२) प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाटल्यानंतर परीक्षा केंद्रावर कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रवेश नसेल.

३) बोर्ड परीक्षा केंद्रावरील शंभर मीटर अंतरावर झेरॉक्स सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील.

४) प्रत्येक तालुक्यात भरारी पथक ही परीक्षा केंद्रावर जाऊन वेळोवेळी तपासणी करेल.

५) परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. परिणामी 144 कलम सुद्धा लागू केला जाऊ शकतो.

६) परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

७) तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध (Rusticate) करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


खालील नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणार कारवाई

१) मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे.

२) परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.

३) परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार

४) मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगता येणार नाही.

५) उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक,अर्वाच्च्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक, फोन नंबर ,भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे.

६) विषयाशी संबधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे, परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे,एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे.