Top News

पोंभूर्ण्याचा धनंजय घात चित्रपटातून बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार #chandrapur #pombhurna


माओवाद्यांच्या जंगलात चित्रित स्लो-बर्न थ्रिलर घात साता समुद्रापार

विश्वास,विश्वासघात व हल्ला यावर आधारीत विदर्भातील कलावंताचा चित्रपट घात


पोंभूर्णा:- पंच्यान्नव टक्के वैदर्भीय कलावंताला घेऊन बनविण्यात आलेला छत्रपाल निनावे यांचा माओवाद्यांच्या जंगलात चित्रित स्लो-बर्न थ्रिलर असलेला घात चित्रपट ७३ व्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रिमियर झळकणार आहे.भारताकडून पाठविण्यात आलेल्या घात चित्रपटात पोंभूर्ण्याचा कलावंत धनंजय सुधाकर मांडवकर यांची प्रमुख भुमिका असून हा सन्मान धनंजयच्या रूपाने झाडीपट्टीतील पोंभूर्ण्या सारख्या छोट्याश्या गावाला मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

घात हा मुख्यतः गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद पसरलेल्या भागात आदिवासींचे जगणे,आदिवासींची कला कौशल्य व संस्कृतीचे दर्शन घडविणारा चित्रपट आहे. गडचिरोलीतील समस्या,आदिवासींचे प्रश्न,नक्षलवाद
पसरलेल्या भागात पोलिसांचे नागरिकांसोबत असणारे संबंध व सदृश्य घटना उघड होतांना दिसते.हा एक थ्रिलर आहे जो जंगलात खोलवर जातो आणि त्यातील पात्रांच्या मानसातही खोलवर जातो.हा चित्रपट विदर्भातील ९५ टक्के कलावंतांना घेऊन बनविलेला असून फिल्म स्टुडिओ प्लॅटून वन फिल्म्सचा नवीन रोमांचक वैशिष्ट्यासह घात चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झडकण्यासाठी सज्ज झाला आहे.जगातील आघाडीचे चित्रपट महोत्सव असलेला बर्लिन चित्रपट महोत्सव येत्या १६ ते २६ फेब्रुवारी२०२३पर्यंत सुरू राहणार आहे.

चतुरस्त्र कलावंत धनंजय मांडवकर


मुलांची प्राथमिक शाळा पोंभूर्णा येथून अशोक बासनवार गुरुजींच्या नेतृत्वाखाली जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रमात धनंजय चौथा वर्गात रंगमंचावर पाऊल टाकला.आणि त्याच्यातील अभिनय कलेचे रोपटे मोठे होवू लागले.पुढे चंद्रपूर, नागपूर असा प्रवास करीत धनंजय ने मास्टर ऑफ फाईन आर्ट्स मध्ये नाट्यशास्त्र विभागात मास्टर डिग्री केली. आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथून विशेष कार्यशाळेत प्रशिक्षण घेतले.द्वंद्व,राकोश,कंबल,या चित्रपटात लहान भूमिका पासून त्याने सुरवात केली.
दस्तखत,ब्यांनव,बॅक डोअर,या लघुपटात अभिनय केला आहे.२०१६ मध्ये धनंजय ने चित्रपटाच्या प्रेमापोटी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथील नोकरी सोडली आणि चित्रपट क्षेत्रातील नव्या वाटेवर पावूल ठेवले.खरं तर त्याचा हा संघर्ष २००२ पासूनच सुरु होता.अनेक अडथळे पार करीत आज २०२३ मध्ये त्याच्या या संघर्षाला यश मिळाले आहे.पोंभूर्ण्या सारख्या ग्रामीण भागात एका शेतकरी व शिक्षक कुटुंबात वाढलेला धनंजय आज बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये घातच्या माध्यमातून वर्ल्ड प्रिमियर झळकणार आहे.धनंजय उत्कृष्ट लेखक,कवी व समीक्षक आहे.त्यांनी आपलं अभिनय व साहित्य लेखन सांभाळून शेती व शेतीपूरक व्यवसाय मोठ्या आवडीने करतो.

ज्येष्ठ विचारवंत आणि वनराई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या सहवासातल्या कार्यपद्धतीतील अनेक अनुभव सोबत घेऊन.व काम कामाचा गुरू असतो ह्या गिरीश भाऊंच्या शब्दांची शिदोरी घेऊन धनंजयने चित्रपट म्हणणाऱ्या संघर्षाला सुरवात केली.

निसर्गाच्या सानिध्यात राहूनच आधी लेखन नंतर अभिनय सादर करता आले.ग्रामीण भागातील दंडार,नाटक,एकपात्री प्रयोग पाहून अभिनय समजून घेता आलं.यातून भजन किर्तन,पोवाडे एवढंच काय तर वासुदेव व गोरखनाथाचे पाळने ही सुटले नाही.आई वडिल,गुरूवर्य,मित्र मंडळी,
माझ्या चित्रनगरी साधनेतील कलावंत व मार्गदर्शकांमुळेच हे शक्य झाले आहे.
धनंजय सुधाकर मांडवकर, चित्रपट कलावंत पोंभूर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने