गडचांदूर पोलिसांची सुगंधित तंबाखू तस्करांवर कारवाई #chandrapur #Korpana

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राज्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी आजही जोमात सुरू असल्याचे चित्र आहे.चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी अन्न व औषध प्रशासन नंतर पोलीस विभागाने या तस्करीवर नियंत्रण मिळविण्याची कारवाई सुरू केली आहे.यामुळे मोठमोठे तस्कर भूमिगत झाल्याची संधी साधत लहान तस्करांनी डोकेवर काढल्याचे पहायला मिळत आहे.


🖼️
याच पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारी रोजी गडचांदूर पोलीसांच्या नाकाबंदी दरम्यान येथील राजीव गांधी(पेट्रोल पंप)चौकात सकाळी 6 च्या सुमारास एका कारला थांबून तपासणी केली असता कारमध्ये सुगंधित तंबाखू भरलेल्या बोऱ्या आढळून आल्या.पोलिसांनी 4 लाख 61 हजाराचा सुगंधित तंबाखू,एक माजा कार क्रमांक MH40-KR-3760 किंमत अंदाजे 5 लाख,असा 9 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी इरफान गडाता रा.गडचांदूर व मोनू सिद्दीकी रा.नांदाफाटा यांना अटक केली आहे.पोलिसांनी आरोपीवर अन्न सुरक्षा अधिनियम अनुसार गुन्हा नोंद करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
🖼️

सदरची यशस्वी कारवाई गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सपोनि रायपूरे, सपोनि शिंदे यांनी केली असून सदर आरोपींनी सुगंधित तंबाखू आणले कुठून? याविषयी तपास सुरू असल्याची माहिती आहे.