Top News

मास्टर ब्लास्टरची आवडती 'भानुसखिंडी' जखमेने विव्हळतेय #tiger #tadobaandhari #chandrapur


लंगडत असतानाचा व्हिडीओ व्हायरल


चंद्रपूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोन परिसरात निमढेला, अलिझंझा गेटमधून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणारी तसेच फेब्रुवारी महिन्यात क्रिकेटर सचिन तेंडुलकर ताडोबात आला असता त्याची आवडती झालेली भानुसखिंडी वाघीण जखमी झाली आहे. जखमेने विव्हळत असतानाच ती आपल्या बछड्यांचीही काळजी घेत आहे. याचा व्हिडीओ पर्यटकांनी व्हायरल केल्याने भानुसखिंडी वाघीण पुन्हा पर्यटकांच्या चर्चेत आली आहे. Master Blaster's favorite "Bhanuskhindi" is writhing with wounds 

भानुसखिंडी वाघिणीचे बस्थान निमढेला, अलिझंझा गेट परिसरात आहे. भानुसखिंडी वाघीण आपल्या तीन बछड्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देत त्यांच्या पोषणासाठी धडपडत आहे. निमढेला परिसरात तीन बछड्यांसह लंगडत चालणारा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शुक्रवारी सकाळी पर्यटकांना ही वाघीण जखमी अवस्थेत दिसून आली. वाघिणीवर वेळीच उपचार करावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी ताडोबा व्यवस्थापनाकडे केली आहे

समाजमाध्यमावरील पर्यटकांनी टाकलेला वाघीण व बछड्याचा व्हिडीओ पाहिला व वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून वाघिणीचा शोध घेत आहोत. त्यात वाघीण लंगडत चालताना दिसत आहे.
किरण धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, खडसंगी, (बफर झोन)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने