पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0


पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील 38 शेतकऱ्यांचे धान खरेदी प्रकरणात एक संस्था तब्ब्ल 23 लाख एवढी रक्कम देण्यासाठी टाळाटाळ होत होती. शेतकऱ्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार वने सांस्कृतिक मत्स्य कार्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. त्या प्रकरणाची तात्काळ दखल घेत 8 एप्रिल ला सर्व शेतकऱ्यांना पोलीस स्टेशन मार्फत पैसे परत देण्यात आले. शेतकऱ्यांनच्या घामाचे कष्टाचे पैसे वापस मिळाल्याचा आनंद झाला आणि शेतकऱ्यांनी त्या आनंदाचे वाटेकरी ना. सुधीर मुनगंटीवार आहेत असे सांगत भाऊंचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

शेतकरी वसंत पोटे पाटील यांनी "भाऊ" आमच्या पाठीशी होते म्हणून आम्ही जिंकू शकलो असे मत व्यक्त केले. तसेच मोरेश्वर धोडरे यांनी सांगितले की, आम्हांला पैसे परत मिळतील की नाही ही आशा सोडली होती परंतु भाऊंनी आम्हांला वारंवार सांगितलं तुमचे पैसे भेटून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आनंद होत आहे असे मत व्यक्त केले. प्रफुल रोहनकर यांनी सांगितले की सर्वच लोक सांगायचे की तुमचे पैसे काही केले तरी परत मिळणार नाही परंतु भाऊंनी सांगितलं तुमचे पैसे भेटणार म्हणजे भेटणार म्हणून भाऊंचे खूप खूप धन्यवाद.
यावेळी श्री. देवराव भाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा, अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, वसंत पाटील पोटे, सुनील बांगरे, प्रफुल रोहणकर, मोरेश्वर धोडरे, कालिदास गव्हारे, मायाबाई कोहळे, बंडुजी देऊलमल्ले, धनराज बुरांडे उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)