गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कट उधळला #chandrapur #action #gadchiroli

दोन  स्फोटके आणि 12 बोर रायफल जप्तगडचिरोली:- नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांना लक्ष ठरवून पेरून ठेवलेले भूसुरुंग स्फोट निकामी करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई धानोरा तालुक्यातील पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील टिप्पागड जंगल परिसरात शुक्रवारी केली. Gadchiroli police foiled the conspiracy of Naxalites

https://chat.whatsapp.com/GGicng7HUvdLEUNXtRUUvM


ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत ग्यारापत्ती मदत केंद्राची पोलीस पार्टी आणि सीआरपीएफचे जवान गोपनीय माहितीवरून अभियान राबवत असताना त्यांना लक्ष करून नक्षलवाद्यांनी जमिनीत स्फोटक पेरून ठेवले होते.


यामध्ये एका डम्पमध्ये 12 बोर रायफल, देशी बनावटीचे दोन स्फोटक, नक्षली लिखाण साहित्य, बॅनर, शूज आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जवानांनी जप्त केले आहे. नक्षलवाद्यांनी पेरलेले स्फोटक वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत