चंद्रपूर:- सद्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करण्याचे अनुसंघाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी/कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून कार्यवाही करण्याच्या त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. Chandrapur local crime branch crackdown on IPL cricket bookies
दि. 08/04/2023 रोजी मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन पो. स्टे. गोंडपीपरी हद्दीतील भंगाराम तळोधी येथे चौकातील मारगोनवार यांचे आटा चक्की समोर अभिलाश शरद मारगोनवार, वय 27 वर्ष रा. भंगाराम तळोधी ता. गोंडपीपरी जि. चंद्रपुर हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) राजस्तान रॉयल्स विरूध्द दिल्ली कॅपीटलया (RR Vs DC) IPL क्रिकेटच्या मॅचवर मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सट्टा चालवीतांना मिळुन आल्याने त्याकडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण 21,705 /- रू. चा माल जप्त करण्यात आला सट्टेबाज अभिलाश शरद मारगोनवार, वय 27 वर्ष रा भंगाराम तळोधी ता. गोंडपिपरी जि. चंद्रपुर यांचे विरूद्ध पो स्टे गोंडपिपरी येथे अप.क्र. १०२ / २०२३ कलम १२ (अ) म. जु का, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो. स्टे. गोंडपिपरी करित आहे.
तसेच दि. 09/04/2023 रोजी मिळालेल्या खबरेवरुन पो. स्टे. रामनगर हद्दीतील इंदीरा नगर चंद्रपुर येथे चौकातील सिद्धु पान सेंटर येथे सिध्दांत माधव गोंडाने, वय 30 वर्ष रा. राजीव गांधी नगर, चंद्रपुर जि. चंद्रपुर हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) कोलकत्ता नाईट रायडर विरूध्द गुजरात टायटन्स (KKR VS GT) क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मॅचवर मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सट्टा चालवीतांना मिळुन आल्यांने त्याकडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण 17,105 /- रू. चा माल जप्त करण्यात आला सट्टेबाज सिध्दांत माधव गोंडाने, वय 30 वर्ष रा. राजीव गांधी नगर, चंद्रपुर जि. चंद्रपुर यांचे विरूदध पो.स्टे रामनगर येथे अप.क्र. ३५७ / २०२३ कलम १२ (अ) म. जु. का, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो स्टे रामनगर करित आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.उप.नि. अतुल कावळे, पोहवा नितीन साळवे नापोशी सुभाष, अनुप, मिलींद, नितेश, पोशी सतीश, मयुर, मिलींद यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.