चंद्रपूर:- सैराट या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक मंजुळे यांचा नवा मराठी चित्रपट 'घर बंदूक बिरयानी' सात एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून यात मूल तालुक्यातील बेंबाळ येथील ललित मटाले याची महत्त्वाची भूमिका साकारत असल्याने झाडीपट्टीच्या रसिकांसाठी हा चित्रपट उत्सुक्याचा बनला आहे.
🎫 आताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून टिकीट बुक करा
All that you would like to explore and know about the movie Ghar Banduk Biryani @BookMyShow https://in.bookmyshow.com/chandrapur/movies/ghar-banduk-biryani/ET00355006
अमिताभ बच्चन यांच्या झुंड नंतर येणारा 'घर बंदूक बिरयानी' हा नागराज चा पहिलाच चित्रपट असून स्वतः नागराजने सुद्धा महत्त्वाची भूमिका केली आहे. शिवाय सैराट मधील परश्या आकाश ठोसर, दक्षिणेतील हुकमी एक्का सयाजी शिंदे, सायली पाटील, तानाजी गलगुंडे असे मातब्बर कलावंत यात आहेत.
चंद्रपूर येथे नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशन झाले त्यासाठी ही सर्व मंडळी चंद्रपूरात आली होती. त्यांच्यासह स्टेजवर ललित मिरवणे ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
ललितचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण बेंबाळलाच झाले. आता त्याने अभिनयात पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. अभिनयाचे बाळकडू त्याला बेंबाळ गावातच मिळाले असे तो मानतो. येथे झाडीपट्टीच्या नाटकांचे प्रयोग बघत तो वाढला. विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथे शिकतांना गावातील नाटकांच्या तालमी व नाटक बघून शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आवडत्या कलावंताच्या तो नकला करायचा. पुण्यात काही वर्षे नाटकातून भूमिका केल्यानंतर बबन, अव्यक्त, मेडिसिन लॅम्प अशा काही चित्रपटातून त्याने अभिनय केला. आता तो नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शन व झी स्टुडिओ च्या बॅनर खाली काम करीत असल्याने झाडीपट्टीचा गौरव वाढला आहे.
नागराज मंजुळे हे नावच मुळात मराठी चित्रटासाठी मोलाचे दगड आहे. या चित्रपटात नेमकं काय आहे हे सांगायला नागराजने नकार दिलाय. तरीही ट्रेलर बघून नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांचे हे कथानक डाकू आणि पोलीस यांच्यातील संघर्षावर असावे असा अंदाज लावता येतो. त्यामुळे 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची उत्सुकता तमाम झाडीपट्टीच्या रसिकांना लागली आहे.
ललित म्हणतो...
झाडीपट्टी रंगभूमी माझी प्रेरणा आहे. बेंबाळला असताना घनश्याम दयालवार यांच्या कॉमेडी रोलची नक्कल करायचा. पुढे किशोर उरकुंडवार यांच्या सानिध्यात कलेचे संस्कार झाले त्यांची लेखन व नाटक बसविण्याची शैली मला प्रभावित करायची. नागराज मंजुळे कडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्यात ते नवोदितांना मित्रांसारखे वागवतात. पुढे वास्तविक जीवनातील विविध पात्र रंगमंच व चित्रपटांतून साकारण्याची इच्छा आहे.
आधार न्युज नेटवर्क व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/BR8TUVM58JuCHuo6bPkLar