Click Here...👇👇👇

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, पतीचा बनाव उघड #chandrapur #Gadchiroli #murder

Bhairav Diwase


गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे चारित्र्याच्या संशयापोटी पतीने पत्नीची विहिरीत ढकलून हत्या केली. ही घटना 29 एप्रिल रोजी घडली. ती 1 मे रोजी उघडकीस आली. खुशी महानंद सरकार (वय 18) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशय; भावाने रागाच्या भरात विषयच संपवला!

महानंद सरकार असे आरोपी पतीचे नाव आहे. श्रीनगर येथील महानंद सरकार याचे चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथील खुशी हिच्यासोबत चार महिन्यापूर्वी विवाह झाला. दोघांचा सुखी संसार सुरू असतानाच पती महानंद याने पत्नी खुशी हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरवात केली.

लग्न समारंभातील फटाक्यांची आतिषबाजीने तीन वऱ्हाडी जखमी

महानंदच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. त्याने 29 एप्रिलला स्वतःच्या शेतातील विहिरीत पत्नी खुशीला ढकलून दिले. तसेच त्या विहिरीत कीटकनाशक सुध्दा टाकले. मुलचेरा पोलीस स्टेशन गाठून पत्नी घरून परस्पर निघून गेल्याच्या बनाव करीत तक्रार केली.


01 मे रोजी स्वतःच पोलीस ठाण्यात विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. मुलचेरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली. आपला खाक्या दाखवताच महानंद याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर मुलचेरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. आरोपी महानंद याला अटक केली.

आता पश्च्याताप केल्याशिवाय महानंदच्या हाती काही राहिले नाही. संसाराचा आनंद घेण्याऐवजी आता त्याला जेलही हवा खावी लागणार आहे. संशयाच्या भुताने त्याला पछाडले होते. तोच भूत आता महानंदच्या मानगुटीवर बसला आहे.