पोंभुर्णा:- दि.01 मे 2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथे शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम सर्व नवीन भरती पात्र मुलांचे व त्यांच्या पालकांंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.
Bravo embed Instagram code MFG, Inc. PO Box 361. Hartland WI, 53029. E info@bravousa.com. P (877) 272-8626 (BravoCo) F (262) 367-0989.
या कार्यक्रमाला संतोष बोंडे अध्यक्ष शा. व्य. समिती, चेकआष्टा, जगन्नाथ येलके उपसरपंच ग्रा. प. चेकआष्टा, जयंत पिंपळशेंडे सदस्य ग्रा. प. चेकआष्टा, सरिताताई मरस्कोल्हे सदस्या ग्रा. प. चेकआष्टा, प्रभाकर मरस्कोल्हे सदस्य शा. व्य. समिती, चेकआष्टा, सिमाताई मरस्कोल्हे आंगणवाडी सेविका, चेकआष्टा, अरुण यामावार मुख्याध्यापक, सतिश शिंगाडे सर, विनोद पोगुलवार सर, सविता लाकडे चेकआष्टा सन्मा. सर्व प्रतिष्ठित नागरीक व मातापालक, सर्व सन्मा. शिक्षकवृंद, चेकआष्टा उपस्थित होते.
इ. १ ली दाखलपात्र विद्यार्थी देवांश अशोक गुंजेकार, आर्यन लव येलके, गार्गी सुनिल पेंदोर, प्रिंसी कालीदास कन्नाके, रेहान प्रविण पिंपळकर, तन्मय सतीश मडावी, अंजली वासुदेव कारेकार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक अरुण यामावार सर यांनी शाळा पूर्व तयारीची गरज काय? याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांचे संचालन विनोद पोगुलवार सर यांनी केले आभार कु. सविता लाकडे यांनी मानले.
फोटो...