Top News

चंद्रपूर जिल्ह्यात बस-दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार #chandrapur #Rajura #accident


राजुरा:- राजुरा गडचांदूर महामार्गावर बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीचालक व त्याच्या मागे बसलेल्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार पांढरपौनी जवळील नाल्या जवळ असलेल्या एन. एन. ग्लोबल कोल वॉशरीज येथील संदिप सिंह वय 31 वर्ष व अन्य एक कामगार आपल्या दुचाकीने पांढरपौनी येथे जात असताना राजुरा येथुन पालगाव कडे जाणाऱ्या बस क्र. एमएच ०७ सी ९५३८ या बसच्या जोरदार धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

सदर बस राजूराहून गड़चांदुर कड़े जात असताना पांढरपौनी जवळील नाल्याजवळ बस आणि दुचाकीत धडक झाली. या धडकीत बस रास्ता सोडून नाल्यात गेली या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाले. मात्र बस मधील प्रवासी सुरक्षित असुन प्रवाश्याना कोणतीही दुखापद झाली नाही. घटनेची माहिती कळताच | गावकऱ्यांनी मदतीकरिता घटनास्थळी धाव घेत पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने