हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लोकांच्या सेवेत #chandrapur #pombhurna


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

पोंभुर्णा:- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे ऑनलाईन उद्घाटन पोंभुर्णा शहरात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पार पाडला.सदर ऑनलाइन उद्घाटन पोंभुर्णा शहरातील डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर चौकात हिंदू हृदहायसम्राट आपला दवाखाना उघडण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रमाकरिता तालुका आरोग्य अधिकारी तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदेश ममीडवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ऑनलाइन कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी सभापती अल्का आत्राम, शिक्षण व क्रीडा सभापती आकांक्षी गेडाम, स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती श्वेता वनकर, नगरसेविका नंदा कोटरंगे नगरसेवक दर्शन गोरंटीवार नगरसेवक संजय कोडापे, भाजपा शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, भाजपा शहर महामंत्री गुरुदास पिपरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोंभुर्णा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा गतप्रवर्तक, आशा कार्यकर्तीनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत