शेतकऱ्यांकडील 'पांढरे सोने' नावालाच #chandrapur #Cotton


चंद्रपूर:- 'पांढरे सोने' म्हटले जाणाऱ्या कापसाची किंमत एक तोळे सोन्याएवढी होती, असे सांगितले जाते. त्यानंतर १०-२० वर्षांच्या काळात गतवर्षी कापसाचे दर मात्र १० हजार रुपयांच्याही पुढे गेल्याने पांढरे सोने पुन्हा चकाकले होते; मात्र यंदा अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याने कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाल्याने दरवाढ होणार अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती. परंतु सतत दर खाली येत आहे.

मागील आठवड्यात ७ हजार प्रति क्विंटल दर असतांना आता पुन्हा ७ हजार रुपयांच्या वर -खाली दर होत आहे. दर वाढण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी असतानाच एप्रिल महिना सुरु झाला तरी कापसाचे दर पाहिजे त्या प्रमाणात वाढले नाही. महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कापूसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जिल्हातही काही भागात विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उत्पादन घेतले जाते. मात्र गत वर्षी कापसाला १० हजार रुपयांचा दर भाव मिळाला. यावर्षी मात्र ७-८ हजाराचा वर वाढला नाही. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षीच्या कमी झालेल्या दराने मोडकळीस आलेला आहे. काही शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस घरीच ठेवल्याचे दिसून येते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या