व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग चंद्रपूर जिल्हा बैठक संपन्न #chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग चंद्रपूर जिल्हा बैठक दि. ०७ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह चंद्रपूर येथे संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडिया नागपूर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक होते. यावेळी व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष विजय सिद्धावार, जिल्हा कार्याध्यक्ष गुरु गुरनुले, महानगर कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया मंचावर उपस्थित होते.

व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी मार्गदर्शन करताना व्हाईस ऑफ मीडिया संघटनेबद्दल माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे कार्यपध्दती, काम आणि महत्व यांच्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष विजय सिद्धावार, सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस भैरव दिवसे तर आभार जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी केले.

यावेळी संजय कन्नावार, राजू बिट्टुरवार, अनुप यादव, श्रीहरी सातपुते, नेहा मानकर, कुमुदिनी भोयर, शब्बीर नुरुद्दिन सय्यद, शंकर महाकाली, मुबारक शेख, अमित राऊत, मनिष तावडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)