विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू #chandrapur #Rajura Woman dies due to electric shock


चंद्रपूर जिल्ह्यातील घटना


राजुरा:- इलेक्ट्रॉनिक हिटर वर पाणी गरम करण्याकरिता गेलेल्या एका 28 वर्षीय महिलेला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे घडली असून सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोनू बाग (28) असे या मृत महिलेचं नाव असून ती राजुरा तालुक्यातील विरुर रेल्वे वसाहतीत राहत होती. नुकतेच सात ते आठ महिन्यांपूर्वी तीचे लग्न झाले होते.

सोनी ही महिला घरकाम करत असताना हिटरवर पाणी गरम करण्यासाठी गेली. यावेळी अचानक तिला विजेचा शॉक लागल्याने ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. यावेळी तिला तात्काळ विरुर येथील खाजगी दवाखान्यात नेले परंतु तिची अवस्था अधीकच गंभीर असल्याने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरकडून या महिलेला मृत घोषित करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविला आहे. याप्रकरणी पुढील तपास विरुर पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत