Top News

स्नेहाच्या लग्नासाठी माजी आमदारांनी पुढे केला मदतीचा हात #chandrapur #bramhapur Former MLA extended a helping hand for Sneha's marriagei


Google ads.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपूरी:- स्नेहाचे लग्न दोन-तीन दिवसावर येऊन ठेपले. घरची परिस्थिती हलाखीची, लग्न म्हंटल की नातेवाईक, वऱ्हाडी यांची सोय करण्याचा जिम्मा उचलावाच लागतो त्यातही बेताची परिस्थिती असल्याने कसे करावे हा प्रश्न भेडसावणे साहजिकच आहे. मात्र माजी आमदार अतुल देशकर यांनी पुढे केलेला मदतीचा हात मालताबाईला सुखावून गेला.

तालुक्यातील वांद्रा येथील रहिवासी मालताबाई मोरेश्वर ठलाल. मिळेल ती मजुरी करून तीन जीवांची खळगी भरवते. कमवते पती वारल्यामुळे घरची जबाबदारी मालताबाईवर आली. १० मे ला थोरली मुलगी स्नेहा हिचं लग्न पार पडणार असून वाढती जबाबदारी, तुटपुंजी कमाई आणि महागाईची झळ बघता खूप मोठा अडचणींचा सामना करून प्रपंच चालवावा लागत आहे.

सदर बाब येथीलच भाजपा सोशल मीडिया संयोजक धीरज पाल यांना कळताच माजी आमदार अतुल देशकर याना पाल यांनी ही व्यथा सांगितली. विलंब न करता देशकर यांनी मदत देण्याचे ठरवले. अतुलभाऊ देशकर विचारमंच ब्रह्मपुरी शाखा वांद्रयाच्या माध्यमातून मदतीचा हात समोर करून लग्न सामुग्री अतुल देशकर यांच्या मदतीने मालताबाईला सुपूर्द करण्यात आली. मालताबाई व परिवार आणि गावातील जनतेने कृतकृत्य आभार मानले.
मालताबाईला मदत प्रदान करताना शंकरदादा सातपुते माजी जि.प.सदस्य चंद्रपूर, धीरज पाल संयोजक भाजपा सोशल मीडिया ब्रह्मपुरी, रामदास कोरडे अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी वांद्रा,डेनी आंबोरकर अध्यक्ष भाजयुमो शाखा वांद्रा, चंद्रशेखर मेश्राम सचिव भाजयुमो तथा अध्यक्ष वन समिती वांद्रा, विलास राऊत सदस्य, टिकाराम ठलाल, रामकृष्ण मेश्राम इत्यादी यावेळी उपस्थित होते.
या कार्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलाल महादेव दोनाडकर, डॉ.गोकुल बालपांडे, माणिक पाटील थेरकर, वंदनाताई शेंडे, तनय देशकर,प्रा.यशवंत आंबोरकर, अविनाश मस्के,प्रमोद पाटील सातपुते, लोमेश मेश्राम, एकनाथ मेश्राम,अजय लाडे,राजेश्वर मगरे, ज्ञानेश्वर भोयर,ज्ञानेश्वर दिवटे, अनील तिजारे,पिंटू आंबोरकर,विलास वाकुडकर, चुमदेव जांभुळकर,परवेश ठाकरे,दौलत गरमळे, नीलकंठ मानापुरे,अरूण झंझाड,उमेश घुले, इत्यादींनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने