Google ads.
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना येथील एका विद्यालयातील शिक्षकाची शाळेसमोरूनच अज्ञात चोरट्यांनी दुचाकी पळविल्याची घटना शनिवारी दुपारी २ च्या सुमारास बाजारवाडी परिसरात घडली.
कोरपना येथील स्व. हरिभाऊ डोहे विद्यालयात कार्यरत शिक्षक दिनकर मणिराम सोनटक्के हे शाळेत आले असता, त्यांनी हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच ३४- एडी ३०७७) ही दुचाकी शाळेसमोर ठेवली. परत जाण्यासाठी निघाले असता, त्यांना दुचाकी दिसून आली नाही. आजूबाजूला त्यांनी याची शोधाशोध केली. मात्र, दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे अखेर कोरपना पोलिस स्टेशन गाठून दुचाकी लंपास झाल्याची तक्रार दाखल केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत