स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोलीसांनी एका आरोपीस केले अटक
हेही वाचा:- दुहेरी हत्याकांडाने तालुका हादरला
पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून तपास करण्यात आला परंतु पोलिसांना यश आले नाही. तब्बल दीड महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका आरोपीला अटक करण्यात यश आले असून काही आरोपी मोकटच आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथ बाबा मंदिरात देखरेखीसाठी बाबुराव संभाजी खारकर वय 80 वर्ष व मधुकर लटारी खुजे वय 65 वर्ष दोन्ही रा. मांगली, ता भद्रावती यांची दिनांक 22 ते 23 मार्च 2023 रोजीचे रात्रौ दरम्यान झोपले असता अज्ञात चोरांनी मंदीरात चोरी करण्याच्या उद्देशाने हत्यारासह प्रवेश करीत हत्याराने त्यांचे डोक्यावर वार करून जिवानिशी ठार माले व मंदीरातील दानपेटीचे कुलूप तोडुन दानपेटीतील नगदी रक्कम अंदाजे 2000 रुपये चोरले व दानपेटी काही अंतरावर फेकुन देण्यात आली.
मंदीरामध्ये घडलेले कुर दुहेरी हत्याकांड संवेदनशील असल्यामुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण होवु नये म्हणुन सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक यांनी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी 8 विशेष तपास पथके तयार करुन सर्व दृष्टीकोणातुन तपास सुरु केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे विशेष पथके हत्याकांडातील आरोपींचा शोध घेणेकामी घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसरात रवाना केले. नमुद पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपूर्ण तपास करून एका आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदारासह मौजा मांगली येथील जगन्नाथ बाबा मंदीरात दानपेटी मधील पैसे चोरी करण्यासाठी गेले असता, मंदीराचे दार उघडत असतांना दाराच्या आवाजाने मंदीरात झालेले मृतक इसम हे जागे झाल्याने त्यांना चोरी करण्यास अडथळा निर्माण होवु नये व त्याचे बिंग फुटू नये या उद्देशाने त्यांनी अत्यंत कुरतेने त्यांच्या हातात असलेल्या हत्याराने वर नमुद मृतकांच्या डोक्यावर तसेच चेहऱ्यावर कुरपणे वार करुन जागीच जिवानिशी ठार मारले व मंदीरातील दानपेटी घेवुन पसार झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आले.
सदर आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भद्रावती यांचे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली असुन गुन्हयातील इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
सदर अत्यंत संवेदनशिल व गुंतागुतींच्या स्वरुपाच्या गुन्हयाचा बुध्दीचार्तुयाने कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, भद्रावती पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, सपोनि जितेंद्र बोबडे, सुधीर वर्मा, अजित देवरे, विशाल मुळे, पोउपनि विनोद भुरले, अतुल कावळे, अमोल कोल्हे, अमोल तुळजेवार तसेच पोहवा संजय अतुकलवार, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठठेवार, विजय नागपूरकर, अली मुजावर, अर्जुन मडावी, संतोष येलपुलवार, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, गोपाल अतकुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, नरेश डाहुले, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे, मिलींद जांभुळे, सतिश बगमारे, अमोल सावे, वैभव पत्तीवार, दिनेश अराडे यांनी केली आहे. पुढील तपास आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा हे करीत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत