Click Here...👇👇👇

धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
भद्रावती:- येथील पिपरबोडी वस्तीत एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याने शहरात खळबळ माजली असून पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, भद्रावती शहराला लागूनच असलेल्या पिपरबोडी वस्तीत सूरज शंकर शेट्टी (३०) हा युवक आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शहरातील जुन्या मच्छी मार्केट जवळ तो नृत्य वर्ग चालवायचा. तसेच मजुरीचीही कामे करायचा.
दरम्यान, आज दि.२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सूरजवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना लोकांना माहीत होताच दोन व्यक्तींनी त्याला स्कुटीवर बसवून येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. 
यावेळी रुग्णालयात येण्यास सर्व नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आली होती. मृतकाच्या कुटुंबियांना सुद्धा आत प्रवेश देण्यात आला नव्हता. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
 जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.