Click Here...👇👇👇

पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
ब्रम्हपुरी:- मुलांसोबत खेळत असलेल्या एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रा येथे घडली. या प्रकरणी युवराज बळीराम मेश्राम (वय ३०) याला पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकून ताब्यात घेतले.
नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पीडित बालिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बालिका मैत्रिंणीसोबत खेळत होती. नराधम युवराज मेश्रामने तिला पकडले व अत्याचार करण्याच्या उदेश्याने एकांतात घेऊन गेला. हा प्रकार पाहून मैत्रीणी घाबरुन पळाल्‍या. पीडित मुलीचे वडील ओरडण्याचा आवाज आल्याने ते चिमुकलीकडे धावत गेले असता हा प्रकार उघड झाला. पीडितेच्या वडिलांनी पोलीस पाटील यांना याची माहिती दिली.
मेंडकी पोलिसांनी लगेच घटनास्थळी येऊन आरोपी युवराज मेश्राम या नराधमाला अटक केली. चिमुकलीला उपचाराकरीता रुग्णालयात भरती करण्यात आले असून, आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पीडित बालिकेच्‍या कुटुंबियांना माेठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करून संताप व्यक्त केला जात असून नराधमाला कठाेर शिक्षा ठाेठावण्‍यात यावी, अशी मागणी हाेत आहे.