वेळवा येथे दहाफुटी अजगराला दिले जीवनदान #Pombhurna


पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा येथील अतुल कुळमेथे यांच्या घराजवळ दहा फुटी अजगर कोंबडीला भक्ष करण्यासाठी आला. कोंबडीला पकडून असतांना लोकांनी पाहिले. याबाबत वेळवा येथील प्राणीमित्र पंकज वड्डेट्टीवार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.वनरक्षक सुरज मेश्राम हे तातडीने तेथे येत अजगारला जीवंत पकडले यावेळी त्यांच्या समवेत पंकज वड्डेट्टीवार व अमित केमेकर मदतीला होते . दहा फुट लांब व पंचेवीस किलो वजनी अजगाराला पकडून पोंभूर्णा येथील संरक्षीत जंगलात सोडून देण्यात आले.
वेळवा गाव हे अंधारी नदीच्या काठावर वसलेले आहे. मागील दिवसांत तीनदा या गावाला पुराचा फटका बसला. पुरामुळे विविध जातीचे अनेक साप गाव परिसरात आले असल्याने गावात साप आढळून येत आहेत. सापांपासून सर्तक राहण्याचे आवाहन प्राणीमित्र पंकज वड्डेट्टीवार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत