पोंभुर्णा शहरात पोळा व तान्हा पोळा सण उत्साहात साजरा #chandrapur #pombhurna

पोंभुर्णा:- वर्षभर शेतात आपल्या बळीराजा सोबत राहुन त्याची सुखदुःखाची साथीदार असलेल्या आपल्या सर्जा-राजा यांच्या गुणगौरव करण्याचा सोहळा म्हणजे पोळा सण हा पोळा सण पोंभुर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोड्या घेऊन शहरातील चौकात जमा झाले यात पोंभुर्णा शहरातील नगराध्यक्षा सुलभा गुरूदास पिपरे यांनी बैलजोडीची पूजा केली व बैलजोडी पकडणाऱ्या शेतकरयांना दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तोरणं तोडले यानंतर बैलजोड्या मंदिराकडे निघाल्या व पोळा सण साजरा करण्यात आला.
 यावेळी पोंभुर्णा शहरातील नगरपंचायत ,उपाध्यक्ष अजित मंगळगिरिवार , नगरसेवक दर्शन गोरंटीवार, नगरसेवक महेश रणदिवे, नगरसेवक संजय कोडापे , नगरसेविका नंदा कोटरंगे , शारदा गुरनुले तसेच गुरूदास पिपरे, मोहन चलाख , आनंदराव मोगरकर , अशोक सातपुते , नगरपंचायत चे कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत