Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #chandrapur #pombhurna

पोंभुर्णा:- वनतलावात फसलेल्या म्हशी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उमरी पोतदार येथे आज घडली.
लक्ष्मण मारोती सोयाम वय ३५ असे मृत युवकाचे नाव असून तो उमरी पोतदार येथील रहिवासी आहे. गावात सर्व नागरीक सण साजरा करीत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. स्वताच्या मालकीच्या म्हशी वनतलावात फसलेल्या असताना त्या म्हशी काढण्यासाठी लक्ष्मण गेला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युने उमरी पोतदार गावात शोककळा पसरली आहे.
मृतकाच्यां मागे पत्नी, मुलगा, मुलगी,आई, वडील,असा आप्तपरिवार आहे. पुढिल तपास उमरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार किशोर शेरकी हे करीत आहेत..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत