Top News

भद्रावतीत आढळले युवतीचे शिर नसलेले धड #murder

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील सुमठाणा तेलवासा रस्त्यावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारती समोर शेतशिवारात एका अज्ञात युवतीचा शिरच्छेद केलेला नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सदर मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत भद्रावती पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे मुंडके व कपडे गायब असल्याने त्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सदर घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. चंद्रपूरवरुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मुंडक्याचा शोध घेण्यासाठी परिसर सील करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच चंद्रपूरवरुन पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली आहे.
मृतक युवती ही अंदाजे २०-२२ वर्षांची असल्याचे समजते. वृत्त लिहीपर्यंत युवतीची ओळख पटली नव्हती. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने