वाघाने केला गुरांवर हल्ला #tiger #tigerattack

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील मेंढा माल गावामध्ये दिनांक 03/04 /2022 ला रात्रौ 1 वाजता च्या सुमारास दिनेश नामदेव शेंडे यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यामध्ये गुरांच्या मोठ्याने ओरडण्याचा चा आवाज आल्याने दिनेश शेंडे यांनी गुरे एकमेकांना मारत असतील, किंवा झुंड झाली असेल या उद्देशाने पाहण्यासाठी गेले असतां वाघ गुरांशी लहान कालवड हिला मारण्या चा प्रयत्न करीत असतां दिनेश शेंडे तिथे गेले असता वाघ तिथून पळाला.

या आधी सुद्धा मेंढा माल येथे अनेकदा वाघाने गाई व शेळ्या आणि कुत्रे यांचा जीव घेतला आहे. म्हणून गावातील सर्व नागरिक वाघाच्या दहशतीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या करिता
फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य ते नियोजन करून वाघांचा बंदोबस्त करून गावातील वातावरण भयमुक्त करावे आणि प्राणी व मानव जीवित हानी टाळावी असे समस्त गावकऱ्यांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या