दुहेरी हत्याकांडाने तालुका हादरला #chandrapur #bhadrawati #murder

Bhairav Diwase


भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील मंदिरातच दोघांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मधुकर खुजे, बाबुराव खारकर असे मृतकचे नाव आहेत. या दोघांचे मृतदेह जगन्नाथ महाराज मठात सापडलेत.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे.

मंदिरातील दानपेटी गायब असल्याने चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.