मी पण तुमच्यातलाच, फरक फक्त वर्दीचा आहे #chandrapur #Korpana #Gadchandur

Bhairav Diwase

असे का म्हणाले ठाणेदार शिंदे


कोरपना:- शांततेत सण-उत्सव साजरे करावे,आपल्या आनंद व उत्साहाच्या भरात दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
कायदा, सुव्यस्था कायम ठेवत सणांचा आनंद घ्यावा, असे आवाहन करत "मी पण तुमच्यातलाच, फरक फक्त वर्दीचा आहे" असे मौलिक मत ठाणेदार रविंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.ते आगामी हनुमान जयंती व रामनवमीच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीची बैठकीत ते बोलत होते.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे,वाहतुक व्यवस्था अशा प्रकारे विवीध विषयांवर चर्चा करून समाधानकारक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार शिंदे यावेळी दिली.सदर सभेला शहरातील विवीध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.