"घर बंदूक बिरयानी " चे चित्रपट प्रमोशनसाठी कलावंत सरदार पटेल महाविद्यालयात

Bhairav Diwase
चित्रपटात नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे आणि सायली पाटील यांचा समावेश 



चंद्रपूर:- झी स्टुडिओ द्वारे निर्मित फिल्म "घर बंदूक बिरयानी" चे प्रमोशनसाठी चित्रपट कलावंत नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे आणि सायली पाटील सरदार पटेल महाविद्यालयात 24 मार्च रोजी दुपारी एक वाजता स्व. शांताराम पोटदुखे सभागृहात उपस्थित होते. यावेळी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, सुदर्शन निमकर, डॉ.किर्तीवर्धन दिक्षीत, मंगेश कुळकर्णी, अश्विन कुमार पाटील, गणेश सपट, प्राचार्य डॉ प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.