शेतशिवारात विज पडून सात जण जखमी #chandrapur #Rajura

Bhairav Diwase


राजुरा:- शेतशिवारात विज पडून सात जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सिंधी गावात घडली. या घटनेतील सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेतात 15 मजुर काम करत असताना मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अचानक विज कोसळून मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी गंभीर जखमी झाले. किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भाष्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृनाल शेषराव बोबडे, अर्चना सुनिल चौधरी हे किरकोळ जखमी झाले असून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय राजुरा दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.