चंदिगडमध्ये चंद्रपुरातील दोन युवकांचा संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ #chandrapur

राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा समावेश

चंद्रपूरच्या मित्राचा मृतदेहही तिथेच आढळला


चंद्रपूर:- दोन मित्र आठ दिवसांपासून बेपत्ता होते. दोघेही तरुण. पंचवीशीच्या घरातले. त्यामुळे ते कुठं गेले, याचा शोध घरचे लोकं घेत होते. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता.

त्यामुळे घरच्या लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, तेही त्यात यशस्वी होऊ शकले नाही. नातेवाईकांकडे शोधाशोध केली. तरीही काही माहिती मिळाली नाही. शेवटी दुःखत घटना समोर आली. त्यामुळे घरच्या लोकांना धक्काचं बसला. ते दोघेही या जगात नाहीत, हे ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनचं सरकली.

चंद्रपुरात खळबळ

चंद्रपूर शहरातील २ तरुणांची चंदीगड येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणांमध्ये माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या सख्ख्या पुतण्याचा समावेश आहे. महेश अहिर असं हंसराज अहिर यांच्या पुतण्याचं नाव आहे. हरीश धोटे असं आत्महत्या करणाऱ्या दुसऱ्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करणारे दोन्ही तरुण जिवलग मित्र होते. १५ मार्चपासून ते चंद्रपूरातून बेपत्ता होते. आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरु आहे. मात्र या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अशी आहेत मृतकांची नावे

चंद्रपूर शहरातील दोन जीवलग मित्रांचे मृतदेह चंडीगडच्या सेक्टर ४३ मधील बसस्थानकासमोर सापडले. (आयएसबीटी-४३) सेक्टर ५२ अंतर्गत कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेतला होता. या घटनेची वार्ता पोहोचताच चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. महेश हरिश्चंद्र अहीर (वय २४, रा. कोतवाली वॉर्ड जलनगर चंद्रपूर) आणि हरीश प्रदीप धोटे (२७, रा. बालाजी वॉर्ड चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. महेश हा केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा पुतण्या आहे.

बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार

चंद्रपूर शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांनी या घटनेची पुष्टी केली. महेश आणि हरीश हे दोघे जीवलग मित्र होते. ते अचानक घरून बेपत्ता झाले. १५ मार्च २०२३ रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार चंद्रपूर पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्याची माहितीही राजपूत यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत