माहिममधली बांधकाम हटवणार
मुंबई:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या गुढीपाडवा सभेमध्ये माहिम भागातल्या समुद्रामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाविषयीची माहिती दिली. तसंच महिन्याभरात हे हटवलं नाही, तर आपण त्या शेजारी गणपती मंदिर बांधू असा इशाराही दिला. त्यानंतर आता लगेचच मुंबई महापालिकेने हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत.
राज ठाकरेंनी काल जाहीर सभेत व्हिडीओ दाखवत माहिम समुद्राच्या परिसरात होत असलेल्या बांधकामाकडे लक्ष वेधलं. हे बांधकाम जर हटवलं नाही, तर त्याच्या शेजारीच गणपतीचे भव्य मंदिर बांधण्याचा इशाराही दिला. त्यानंतर प्रशासनाने लगेच त्या भागातली सुरक्षा अधिक कडक केली.
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याचे आदेशही दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने सहा जणांचे पथक नेमले आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून हे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू केलं जाण्याची शक्यता आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत