Pombhurna Ganpati Visarjan: पोंभुर्णा गणेश विसर्जन वाद प्रकरण; २१ जणांवर गुन्हे दाखल

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- पोंभुर्ण्यात गणेश विसर्जनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. विसर्जन मिरवणुकीत पोलीस आणि 'विघ्नहर्ता गणेश मंडळा'च्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, ज्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. 
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरात गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाल्यानंतर, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या घडामोडीनंतर अखेर पोलीस बंदोबस्तात बाप्पाचे विसर्जन पार पडले. याप्रकरणी पोंभुर्णा पोलिसांनी कडक पावले उचलत २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सध्या १४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून 7 जण फरार आहेत. सध्या पोंभुर्णा शहरातील परिस्थिती पूर्णपणे शांत आणि नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे:

या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून खालील २१ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे:
बालाजी वसंत भांडेकर (वय २९), कपिल लक्ष्मण बावणे (वय ३१), राहुल प्रभाकर देवतळे (वय २६), वृषभ अरुण नैताम (वय २३), महेश अरुण नैताम (वय २५), अमित नंदकिशोर नैताम (वय ३१), अमित दादाजी भांडेकर (वय ३६), अजित सदाशिव धोडरे (वय २४), प्रतीक शालीक दुधबळे (वय २४), राकेश ऋषीदेव देवतळे (वय ३०), निखिल संतोष शेट्टे (वय २५), साहिल बाळू नैताम (वय २२), विनोद अशोक चांदेकर (वय ४८), संतोष उद्धव पारलेवार (वय ३९) यांना ताब्यात घेण्यात आले असून दिनेश प्रभाकर नैताम (वय ४०), निखिल किशोर आरमिडवार (वय २६), जयंत मुरलीधर टेकाम (वय २७), राकेश आनंदराव मोगरकर (वय २८), गुणवंत उर्फ अनुराग ज्ञानदेव धोडरे (वय २३), संदेश ज्ञानदेव धोडरे (वय २१), अल्का बाळू नैताम (वय ४१ ) यांचा पोलीस शोध घेत आहेत.


नोंदवण्यात आलेली कलमे: भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ४९, १२६(२), १८९(२), १८९(३), २२३ सहकलम ८५(१) म.दा.का. आणि सहकलम ३८, १३६ मु.पो.का. अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले उपस्थित होते. पुढील तपास पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल ठेंगणे करीत आहे.