युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

Bhairav Diwase
0

चिमूर:- चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे आणि युवासेना जिल्हाप्रमुख मनिषभाऊ जेठाणी यांच्या नेतृत्वात युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे यांच्या वाढदिवसानिमित्त तपोभूमी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गोशाला गोंदेडा येथे गोमातास पोषक आहार म्हणून गुळ वाटप करण्यात आला, तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळ वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किन्नाके, डॉ.हलगे, डॉ. संजय गायधनी, मालेकर सिस्टर, दिपाली सिस्टर, कल्याणी फटका, श्वेता वांढरे, किशोर वरखडे आदी कर्मचारी उपस्थित होते.


तसेच युवासेना कार्यकर्ते - शार्दुल पचारे ,रोहन नन्नावरे, विकास जांभुळे, विशाल शिवरकर निखिल गिरी, विशाल शेंडे,सनी गेडाम ,अजय मोहिनकर ,कुणाल खिरडकर, वैभव मसराम, रितिक वाघमारे, समीर गिरी, अक्षय नागपुरे, शैलेश वाघमारे, साहिल मेश्राम, दुर्वेश हजारे, पवन डोंगरावर, संदीप घोडमारे ,पवन झाडे यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व युवासेना जिल्हाप्रमुख मनिष जेठाणी यांनी मोबाईल फोन द्वारे शार्दुल पचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)