बाजारातील घाणयुक्त कचरा..! जनता "त्रस्त", सत्ताधारी "मस्त"
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत हल्ली मोठ्याप्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे. कुणाचाही प्रभाव नसल्याने याठिकाणी एकुण-एक कामांचा बोजवारा उडाला आहे. केवळ आणि केवळ 'माल सुतो' हाच एककलमी कार्यक्रम याठिकाणी सुरु असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे
हे चित्र पाहून न.प. चे विरोधी नगरसेवक जर शहरातील नवीन रोड, नाली बांधकामात भ्रष्टाचार, नाली सफाई व शहरातील इतर विकासात्मक विषयांवर बोलले तर त्यांना "विरोधी आहे. कोणत्याही कामात त्यांना विरोध करायची सवय आहे' असे बिनबुडाचे उत्तर दिले जातात. आता खुद्द मात्र सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच सह पक्ष राकाँच्या जिल्हा महासचिवाने घराजवळील 'चिकन मार्केट' चा दुर्गंधीयुक्त घाण कचरा' चक्क नगरपरिषद सभागृहात व कक्षात फेकून सत्ताधाऱ्यांना अक्षरश: 'घरचा आहेर' दिला आहे. सध्या गडचांदूर नगरपरिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता......
काँग्रेसच्या सविता टेकाम नगराध्यक्ष तर राकाँचे शरद जोगी हे उपाध्यक्ष म्हणून याठिकाणी विराजमान आहे. असे असताना पुर्वीच्या काळात नागरिकांपुढे निर्माण झालेल्या समस्या तत्परतेने मार्गी लावण्यात येत होत्या. मात्र मागील दीड वर्षात आत्ताच्या नगराध्यक्षा, उपाध्यक्ष व समस्त नगरसेवक आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी, ही संपूर्ण मंडळी कामचुकारू, आपल्या पदाला न्याय न देणारी, जनतेच्या विश्वासावर खरे न उतरणारी निघाली आहेत. याठिकाणी काँग्रेस व राकाँ म्हणजे आमची व माझ्या पक्षाची सत्ता असल्याने लेखी तक्रार न करता हक्काने वारंवार या लोकांना तोंडी सूचना देऊन याकडे लक्ष देण्याची विनंती करत होतो. 'आमच्या घराजवळ चिकन मार्केट आहे आणि त्या चिकन मार्केटची घाण सतत आमच्या घराजवळ टाकली जाते, आम्हाला त्या दुर्गंधीयुक्त घाणीचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे याठिकाणी बेवारस कुत्रे, डुकरांनी बस्तान मांडले आहे. इतरांना बोलून आपल्याच लोकांची बदनामी होईल, यामुळे आमच्या वरिष्ठाना आम्ही भोगत असलेल्या नरक यातना सांगितल्या,
घरासमोरील घाणीमुळे मी आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहोत. दुर्गंधीमुळे तेथे वास्तव्य करणे कठीण झाले आहे. घाण साफ करावी, अशी अनेकदा तोंडी मागणी केली. दूरध्वनीवर तक्रारी नोंदविल्या. परंतु कोणीही या समसेकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव मृत कोंबड्या आणि कचरा टाकावा लागला. यातून नगरपरिषदेला जाग येईल आणि दुर्गंधी साफ करेल. हा उद्देश होता.
रफिक निजामी,
कचरा फेकणारा त्रस्त नागरिक
स्वताच्या ठरावाचा विसर
नगरपरिषेदत १६ मार्च २०२० रोजी सभा पार पडली. या सभेत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेली चिकण, मटणची दुकाने एका ठिकाणी हलविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. परंतु, तीन वर्षांचा काळ लोटूनही नगरपालिकेला जागेचा शोध घेता आला नाही. तसेच पदाधिकान्यांतील आपसी मतभेदसुद्धा याला कारणीभूत ठरले असल्याची चर्चा आहे. नगरपालिकेने चिकण, मटनची दुकाने हलविली असती, तर आजचा प्रकार घडला नसता, अशी चर्चा गडचांदुर वासीमध्ये आहे.