भाजपा कडून पूरपरिस्थितीची पाहणी व धान्याची किट वाटप #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री यांचे मार्गदर्शन खाली आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक 24/07/2023 ला पोंभूर्ण्या तालुक्यातील अतिवृष्टी मुळे अनेक गावानं मध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे काही गावातील घरामध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे त्यांना कुठे शाळेत तर कुठे सामाजिक सभागृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्या संबंधने पाहणी करून त्यांना धान्याची किट देण्यात आली व पूर परिस्थिती पाहणी केल्या नंतर घरांची पडझाडं आणि शेतीचे नुकसान याची लवकरात लवकर पचनामे करून शासनला पाठवावे अशा प्रकारे तहसीलदार पोंभुर्णा यांचेशी चर्चा करण्यात आली.
यावेळी कु. अल्काताई अत्राम भाजपा प्रदेश महामंत्री महिला मोर्चा, विनोद देशमुख माजी उप सभापती, ईश्वर नैताम महामंत्री, हरीष ढवस महामंत्री, तूळशिराम रोहनकर निराधार योजना अध्यक्ष, सचिन पोतराजे सरपंच, शुभांगी कुत्तारमारे सरपंच, रोशन ठेंगणे उपसरपंच, प्रेमदास इष्टाम सदस्य, कुळमेथे सदस्य, कडते सदस्य, लक्ष्मण शेडमके, बापूजी शेडमके, राजू ठाकरे, अजित जांबुलवार इत्यादी कायकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)