Top News

पोंभूर्णा-कसरगठ्ठा मार्गावरील त्या अपघाग्रस्त वळणावर सूचना फलक लावून गतीरोधक निर्माण करा:- मनसे #chandrapur #pombhurnaपोंभूर्णा:- पोंभूर्णा बल्लारपूर मूख्य मार्गावरील कसरगठा गावाजवळील वळणावर गतीरोधक निर्माण करन्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथीसेनेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आशिष नैताम यांचे वतीने सार्वजनीक बांधकाम उपविभाग पोंभूर्णा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मौजा पोंभूर्णा ते कसरगठा मार्गावर अपघातग्रस्त वळून असून या वळणावर अनेक अपघात झाले अपघातात दोन व्यक्तींना आपला जीव हि गमवावा लागला असे अपघात या ठिकानी वारंवार घडु नयेत यासाठी आपल्या कार्यालया अंतर्गत संबधीत वळणावर सूचना फलक लावून दोन्ही बाजूला गतीरोधक निर्माण करन्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनदिप रोडे, मनसे तथा मनविसे जिल्हाध्यक्ष श्री.राहूल बालमवार,मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. कुलदीप चंदनखेडे तथा पोंभूर्णा मनसेचे तालूका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार यांच्या प्रमूख मार्गदर्शनात सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोंभूर्णा येथे देन्यात आले सदर निवेदनाची दखल आठ दिवसाचे आत नाहि घेतल्यास मनसे आपल्या शैलीने आक्रमक आंदोलन करणार असून याला सर्वस्वी संबधीत विभाग जबाबदार राहणार असा ईशाराही यावेळेस देन्यात आला निवेदन देणार्या शिष्टमंडळात पोंभूर्णा मनसेचे शहराध्यक्ष निखील कन्नाके, मनविसे तालूका सचिव महेश नैताम, मनसेचे मूल तालुका अध्यक्ष स्नेहल झाडे तथा मनसैनिक उपस्थीत होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने