बल्लारपूर शहरातील बामणी येथे चुकीच्या पद्धतीने ले-आऊट टाकून विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी:- मोहीत डंगोरे


बल्लारपूर:- शहरातील मौजा.बामणी तह. बल्लारपूर येथील भूभाग. क्र.३०७ हा पुर बुडीत क्षेत्र असून ह्या संबंधित जमिनीवर एलिव्हेट नामक कम्पनीनेे चुकीच्या पद्धतीने ले-आऊट तयार करून लोकांची फसवणूक करून विक्री करण्याचे काम सुरू केले आहे.नियमानुसार ले-आऊट बनत असताना रस्ते,नाल्या,इलेक्ट्रीक पोल व ओपन स्पेस व पब्लिक युटीलिटी अशा पायाभूत सुविधा ले- आऊट मान्यते च्या अगोदर करून दिलेे पाहिजे परंतु अशा प्रकारची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना त्यांना ले- आऊट मंजूर झाला कसा ? परंतु अशी कुठलीही सुविधा उपलब्ध करून न देता विक्री करून लोकांची फसवणूक करण्याचे काम ह्या कम्पनी तर्फे करण्यात येत आहे.
संबंधित विषयाचा गांभीर्य बघून भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांनी दिनांक २६/०७/२०२३ रोजी माननीय उप जिल्हा दंडाधिकारी साहेब तह. बल्लारपूर जि. चंद्रपूर यांना निवेदन देऊन त्या ले- आऊट ची मान्यता झाली असेल तर ती रद्द करण्यात यावी किंवा नसेल झाल्यास चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या विक्रीस आळा टाकावा अशी मागणी केली. या वेळी उपस्थित दर्शन मोरे, धनसिंग पटेल, सुरज चौबे, लखन बानोत, प्रथम शेंडे, वमशी बोडूवार होते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत