लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी chandrapur pombhurna

Bhairav Diwase
0

पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आज दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स चे हेड ऑफ द डिपार्टमेंट प्राध्यापक उपरवट सर तसेच एनएसएस सहाय्यक अधिकारी डॉक्टर ओमप्रकाश सोनवणे सर मंचावर उपस्थित होते
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चिंतामणी महाविद्यालयाचे एच.ओ.डी. पोंभुर्णाचे वाणिज्य शाखेचे प्रा.नितीन उपरवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, लोकमानय टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले. 'स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या घोषणेतून त्यांनी भारताच्या स्वावलंबनाची चळवळ सुरू केली. त्यांनी "गणपती उत्सव" आणि "शिवाजी महोत्सव" असे दोन उत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये सर्व वर्ग सहभागी झाले. याबाबत माहिती दिली.
           अण्णाभाऊ साठे यांच्या कविता आणि साहित्याची जयंती हा भारतात सांप्रदायिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहाचा उत्सव म्हणता येईल. यात्रेदरम्यान त्यांच्या कवितांचे वाचन, संगीत, नाटक, साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि योगदान जनतेने लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एम.टी. चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णाचे प्राचार्य नक्षीने सर म्हणाले की टिळकांनी भारतीय नेतृत्वाच्या तीन विचारधारा मांडल्या.
"आमचा अभिमान आणि विश्वास" - भारतीयांना स्वातंत्र्य मागण्याचे धैर्य दिले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" - त्यांनी भारतीय स्वराज्याचा उच्च विचार केला.
"पूर्वेची ती संस्कृत, पण पूर्वेचा हा आत्मा आमचा" - भारतीय संस्कृतीचे समर्थन केले.
    टिळकांचे योगदान प्रामुख्याने जनतेला स्वराज्य लढ्याची जाणीव करून देणे आणि त्यांच्या वैचारिक विश्वासाचे नेतृत्व करणे हे होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जीवनदायी आणि प्रेरणादायी असायला हवे.
                     लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन खूप वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी विविध विषयांवर कविता लिहून समाजाला संदेश दिला. धर्म, स्वातंत्र्य, जात, स्त्रिया हे प्रश्न त्यांच्या कवितांमध्ये संवेदनशीलपणे दिसतात.
कार्यक्रमांचे संचालन एनएसएस अधिकारी डॉक्टर पौर्णिमा विश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन एनएसएस सहाय्यक अधिकारी डॉक्टर ओमप्रकाश सोनवणे सर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)