(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोरोना कालावधीत तब्बल दोन वर्षे बंद असलेल्या भद्रावती नगर परिषदेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या भद्रावती भूषण तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावर्षी 15 ऑगस्टला शहरातील मुरलीधर पाटील गुंडावर सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांनी भद्रावती भूषण पुरस्कारासाठी आपले अर्ज पालिकेकडे सादर करावे व शहरातील कान्व्हेंट, प्राथमिक,पूर्व माध्यमिक, माध्यमिक, विद्यालय व महाविद्यालयांनी आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी व्हावे व त्यासाठी आपल्या शाळेची यादी नगरपरिषद कार्यालय येथे सादर करावी असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे.
2003 पासून भद्रावती नगर परिषदेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करण्यात येत होते. मात्र करोणा काळात हे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील सामाजिक, सांस्कृतिक ,साहित्यिक, क्रीडा, संगीत व कला तथा इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना भद्रावती भूषण पुरस्काराचे प्रदान करण्यात येते. तथा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा ठेवून शहरातील शाळांना गौरविण्यात येते. सदर कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची व गुणवंत विद्यार्थ्यांची यादी तसेच भद्रावती भूषण पुरस्कारासाठी इच्छुक नागरिकांनी आपल्या माहितीसह आपली नोंदणी 10 ऑगस्टपर्यंत पालिकेच्या कार्यालयात करावी असेआवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे.