Chandrapur News: प्रभाग १५ मध्ये सिव्हरेज कामामुळे रस्त्यांची दुर्दशा; नागरिक त्रस्त; श्याम बोबडे यांचे आयुक्तांना साकडे

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभाग १५ मधील नागरिक सध्या नरकयातना भोगत आहेत. विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या सिव्हरेजच्या कामामुळे संपूर्ण परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. याच मुद्द्यावरून आता जनआक्रोश निर्माण झाला असून श्याम बोबडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विठ्ठल मंदिर प्रभाग १५ मध्ये गेल्या काही दिवसांपासून सिव्हरेजचे काम सुरू आहे. मात्र, हे काम नागरिकांच्या सोयीसाठी आहे की त्रासासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. खोदकाम केल्यानंतर रस्त्यांची मलमपट्टी न केल्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.


धुळीचे लोट: कच्च्या रस्त्यांमुळे परिसरात प्रचंड धूळ उडत असून श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांडपाण्याची समस्या: फुटलेल्या गटारांमुळे रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

प्रशासनाला निवेदन: या सर्व समस्यांबाबत श्याम बोबडे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.