डुम्मे नाल्यात बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू #gadchiroli #chandrapur #death

Bhairav Diwase
गडचिरोली:- एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील युवकाचा डुम्मे नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चोवीस तासांतच तोडसा येथील आणखी एका युवकाचा त्याच नाल्यात बुडून मृत्यू झाला.



ही घटना आज (दि.१०) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अमित डोलू तिम्मा (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. दरम्यान, अमितचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.


अमित तिम्मा हा मंगळवारी सकाळी एटापल्लीला जातो, असे सांगून घरुन निघून गेला. परंतु, रात्रीपर्यंत तो घरी परतलाच नाही. आज सकाळी मरपल्ली येथील नागरिकांना अमितचा मृतदेह डुम्मे नाल्यात तरंगताना आढळला. एटापल्ली पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. दरम्यान, अमितचा मृत्यू संशयास्पद असून, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यकत केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.