येत्या 26 तारखेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यासाठी 2500 युरिया उपलब्ध करण्याचे कृषिमंत्री व सचिवांचे आश्वासन.
Bhairav Diwase. July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्ह्यात युरिया खताच्या टंचाईची झळ शेतकऱ्यांना पोहचत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे .आज जिल्ह्यात 17 हजार मेट्रीक टन युरियाची आवश्यकता आहे .आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित युरिया खताची टंचाई दूर करण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे व सचिव एकनाथराव डवले यांच्याकडे केली. येत्या 26 तारखेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यासाठी 2500 युरिया उपलब्ध करण्याचे आश्वासन कृषिमंत्री आणि सचिवांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.
जिल्ह्यात युरिया खताच्या टंचाईच्या समस्येबाबत अनेक शेतकऱ्यांनी आ. मुनगंटीवार यांना निवेदने दिलीत . त्या अनुषंगाने त्यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे आणि सचिव एकनाथराव डवले यांच्याशी चर्चा केली . ऐन हंगमातच शेतकऱ्यांना आवश्यक खतांच्या टंचाईला सोमोरे जावे लागत आहे. मागणी केलेली खते मिळत नाहीत, उपलब्ध असल्यास जास्त दराने खरेदी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याची चित्र समोर येत आहे. प्रामुख्याने युरियाच्या टंचाई मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अशी भूमिका आ मुनगंटीवार यांनी विशद केली. त्यामुळे आ. मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार 26 मे पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यासाठी 2500 टन युरिया उपलब्ध करण्याचे आश्वासन कृषिमंत्री आणि सचिवांनी दिले .