पोंभूर्णा तालुक्यांतील घनोटी तूकूम, थेरगाव रै., चेक खापरी(कवठी), देवाडा खुर्द येथील अनेक विविध पक्षांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गीर्हे यांच्या प्रमुख उपस्थित.
Bhairav Diwase.    July 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी तूकूम येथील भाजपाचे कार्यकर्ते रामकृष्णजी गव्हारे, पुर्षोतम गव्हारे,किशोर दूधबळे, व शामसुंदर नैताम यांच्या नेतृत्वात गावातील अनेक कार्यकर्ते, युवकांनी आज घनोटी तूकूम येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गीर्हे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत रितसर पक्ष प्रवेश घेतला.

थेरगाव रै. येथील ग्रामपंचायत सदस्या श्रीमती गोपीका कवडु तोरे व अभय अर्जुन सातपूते यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश केला.


चेक खापरी (कवटी ) येथील शेतकरी संघटनेचे तुळशीराम वाढई व दॆवाडा बु.येथील भाजपाचे सुरेश पा.बोकडे व दीघोरी येथील सौ.निर्मलाताई मारोती ईरगिरवार व चेक बल्लारपूर येथील बंडू पाटील कुंचेवार व आबेधानोरा येथील रणजीत पेन्दोर यांनी आज शिवसेना प्रवेश केला. 

दॆवाडा खुर्द  येथील काँग्रेसचे विजय वासेकर व भाजपाचे भुजंगभाऊ देऊरमले व सौ.अल्काताई बुरांडे, दामोदर घोंगडे, विलास बुरांडे व आदी अनेक कार्यकर्त्यांनी आज  शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गीर्हे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला

यावेळी शिवसेना नेते दिलीपभाऊ कपूर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की भय्या यादव, युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष कावटवार,विनोद चांदेकर, गणेश वासलवार व आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत