संबंधित कंपनीचे दुर्लक्ष.
Bhairav Diwase. July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली शहर महाराष्ट्र ते छत्तीसगड या राष्ट्रीय महामार्गावर असून या शहरातून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शहरातून चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम मे. गुरु बक्षानी या कंपनी द्वारे सुरु आहे. मुख्य मार्गाची एक बाजू तयार झाली आहे. त्या मार्गावरून वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु मुख्य मार्गाला लागूनच डॉ. आंबेडकर चौकात महाकाय खडा असून या महामार्गावरून वाहतूक करताना मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र अशा गंभीर बाबीकडे सादर कंपनी चे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील डॉ आंबेडकर चौक हे गजबजलेले ठिकाण असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. शिवाय याच चौकात लहान मुलांची अंगणवाडी सुद्धा आहे. या अंगणवाडीत येताना लहान मुलांना मुख्य मार्ग ओलांडून यावे लागते. परंतु सादर खडा मुख्य मार्गावरच असल्याने लहान मुलांना अडचण निर्माण होत आहे. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. या पावसामुळे सदर खडा तुडुंब भरला असून लहान बालके पाण्यामध्ये खेडण्यास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
नवीन मार्गावरून वाहतूक सुरु केल्याने मार्गावरून येणारे वाहन त्या खड्यात येऊन मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात असली तरी याकडे मात्र संबंधित कंपनी कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येते. शिवाय अनेकदा या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून प्रवाश्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. या खड्यामुळे अपघात होऊन जीवित हानी झाल्यास कंपनीवर मनुष्य वधा चा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी जार धरत आहे.