प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून यावर्षी गणेशोत्सव साजरा करा.

Bhairav Diwase
उत्सवादरम्यान प्रशासनाचा या सूचनांचे पालन करा.
Bhairav Diwase. Aug 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोना मुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना प्रत्येकच क्षेत्रावर पडल्याचे दिसून येत आहे. यापासून धर्म आणि श्रद्धा हेही सुटलेले नाहित. महाराष्ट्रातील गणेशोत्सव देशात प्रसिध्द आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ भाविकांवर आली आहे. उत्सव कसे साजरे करावे याकरिता शासनाने परिपत्रकच काढले आहे.

गणेशोत्सव अवघ्या काहि दिवसांवर असून मूर्तिकारांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वेळ कमी व काम अधिक तसेच वरून अस्मानी ढगाळ वातावरण यात मूर्तिकारांची चांगलीच ओढाताण होत असली तरी शासनाचा सूचनांचे पालन करून तसेच मूर्तीची उंचीची मर्यादा लक्षात घेता मूर्तिकार जलद गतीने मूर्ती घडवीत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे यंदा २२ आगस्टला लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून सार्वजनिक गणपती मूर्तीसाठी ४ फुटांची मर्यादा घालण्यात आली तर घरगुती मूर्तीसाठी २ फुटाची मर्यादा घालण्यात आली आहे.


उत्सवादरम्यान प्रशासनाचा या सूचनांचे पालन करा.
पूजेचा पूर्वी सर्व गणेश मंडळांना स्थानिक प्रशासना कडून परवानगी घ्यावी लागेल.

न्यायालयाचा सूचनांचे पालन करून लहान मंडप बनवावे व कमीत कमी सजावट करावी.

सार्वजनिकस्थानी प्रतिष्ठापना होणारी मूर्तीची उंची ४ फुट तर घरगुती मूर्ती २ फुट असावी.

जाहिराती असाव्या मात्र गर्दी करण्याचे आवाहन नसावे, जाहिरातीचे स्वरूप हे आरोग्य व सामाजिक संदेश यावर केंद्रित असावे.

सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्याशी निगडीत जसे रक्तदान शिबीर, कोरोना, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारापासून वाचण्याकरिता जनजागृती अभियान चालवावे.

ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी पाळावी.

दर्शनाकरिता ऑनलाईन व्यवस्था करावी. त्यासाठी केबल नेटवर्क तथा फेसबुक सारख्या माध्यमाचा उपयोग करता येईल.

गणेश मंडपाचे सेनीटायझेशन करत राहावे तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. भाविकांना मॉस्क लावणे व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.

आगमन आणि विसर्जन मिरवणूक होणार नाहि. विसर्जन स्थळी जी आरती केली जाते, ती घरीच केल्या जाईल. लहान बालके तसेच वयस्कर व्यक्ती विसर्जन स्थळी जावू शकणार नाहीत.

विसर्जनाकरिता एकाच वेळी अनेक मुर्त्या बाहेर काढता येणार नाही.

मूर्ती विसर्जनासाठी स्थानिक प्रशासनए लोकप्रतिनिधी, एनजीओ यांच्या मदतीने कृत्रिम तलाव तयार केले जावे.

वरील सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करुन शासन व प्रशासनास मदत करण्याचे आवाहन आधार न्यूज नेटवर्क तर्फे करण्यात येत आहे.