Top News

नकोडा-मारडा जि.प. क्षेत्रात पशुवैद्यकीय चिकित्सा शिबीर अयोजित करा.

जि.प.सदस्य पाझारे यांचे मु. का. अ ला निवेदन.
Bhairav Diwase. Aug 19, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पशुधनावर लंप्पी या त्वचेच्या रोगाने अनेक जनावर बाधित झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद क्षेत्र नकोडा मारडा येथील जनावरांच्या आरोग्य चिकित्सा शिबिरांचे आयोजन करून करण्यात यावी अशी मागणी जि प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना भेटी दरम्यान दिलेल्या निवेदनातून केली आहे. याच वेळी त्यांनी उपरोक्त विषयाला आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गांभीर्याने घेतले असून आ मुनगंटीवार यांना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी लस व औषधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे,याकडेही लक्ष वेधले.

जिल्ह्यात किमान ५० हजार जनावरे लंप्पी या रोगाने ग्रस्त आहेत.यात नकोडा-मारडा जि प क्षेत्रातील नकोडा, उसगाव, वढा, पांढरकवडा, शेंनगाव, सोनेगाव, अंतुरला, देवाडा, वेंढली, महाकुर्ला, आरवट, सिदूर, धानोरा मारडा व पिपरी येथील जनावरांचा ही समावेश आहे. आधीच शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकट, त्यात कोरोनाचा उपद्रव सुरू असताना लंप्पी आजारग्रस्त जनावरे झाल्याने,तिहेरी संकट ओढवले आहे. म्हणून जि.प प्रशासनाने या सर्व गावात तातडीने जनावरांचे चिकित्सा शिबीर सुरू करावे, अशी मागणी पाझारे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने