भाजपा तर्फे आनंदवनात पंतप्रधान मोदीं यांचा वाढदिवस साजरा.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून करण्यांत आला,  त्याच प्रमाणे वरोरा आनंदवन येथे सुद्धा नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते कोरोना पासून सुरक्षा करण्या करिता येथील दिव्यांगांना वेपोरायझर मशीन व आर्सेनिक अल्ब ३० औषधांचे वाटप करण्यात आले.  यावेळी  कार्यक्रमाचे आयोजक चंद्रपूर महानगर भाजपा अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी आपल्या मनोगतात पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या कार्याची प्रशंसा करून आपल्या जिल्ह्या चे विकास पुरुष म्हणून ओळखले  जाणारे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची  मुक्त कंठाने स्तुती केली.

      यावेळी मनपा महापौर राखी कांचरलावार, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासमगोट्टूवार, प्रशांत विघ्नेश्वर, श्रीराम पाणेरकर यांची उपस्थिती होती. 
     पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात कोरोनाने सगळी कडे  आपले पाय पसरविले आहे, त्याला रोखण्याकरिता आपण स्वतःला कसे सुरक्षित ठेवता येईलयाचे मार्गदर्शन केले, त्याच अनुषगाणे आपले विकास पुरुष सुधीर भाऊंनी कोरोनाशी लढण्या करिता हे साहित्य वाटपाचे कार्य आम्हाला सोपविल्याचे सांगितले. वरोरा नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी मोदींजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले व कोरोना विरुद्ध लढण्याकरिता साहित्य व औषध वाटप करून जिल्हा वासीयांची काळजी घेतल्या बद्दल सुधीर मुनगंटीवरचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आनंदवनचे व्यवस्थापक डॉ गौतम करजगी यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी आनंदवन ग्राम.सरपंच सुधाकर कडू, डॉ विजय पोळ, भाजप तालुका प्रमुख डॉ भगवान गायकवाड, सुरेश महाजन आणि ओम मांडवकर आदी उपस्थित होते.