भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजय टिपले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने हाडाचा शिक्षक व भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. प्राचार्य विजय टिपले यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन दिर्घकाळ समाजसेवा केली असून ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. म.रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्यपदही यांनी भूषविले. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून भारतीय जनता पार्टीचा हाडाचा कार्यकर्ता व ओजस्वी वक्ता काळाच्या पडदयाआड गेला आहे. परमेश्वर त्यांच्या कुटूंबियांना धीर देवो अशा शब्दात आ. मुनगंटीवार यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे.
आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐