माजी केंद्रीय गृहराज्यत्री हंसराज भैय्या अहिर यांनी ज्ञान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रजिस्टर, पेन, मास्क करुन दिले उपलब्ध.
अनिकेतचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत केला सन्मान.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत. त्यामुळे गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.अशावेळी गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी या गावातील अनिकेत दुर्गे या युवा मित्रांनी आपल्या गावात ज्ञान शाळा सुरू करून जवळपास ४० विद्यार्थ्यांना रोज शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य करतो आहे.
तेव्हा या ज्ञान शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये, म्हणूनच आदरणीय माजी केंद्रीय गृहराज्यत्री हंसराज भैय्या अहिर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या विधायक कार्यास शुभेच्छा देत ज्ञान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रजिस्टर, पेन, मास्क उपलब्ध करून दिले त्याबद्दल आदरणीय भैय्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त केले.
या प्रसंगी अनिकेतचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला व या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती सौ सुनीताताई येग्गेवार, भानेष येग्गेवार, सौरभ येग्गेवार व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.