घुग्गुस नगरपरिषदेचे स्वप्न धुळीस मिळणार का?

Bhairav Diwase
जानेवारी महिण्यात संभाव्य निवडणूकीची चर्चा.
Bhairav Diwase. Oct 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्गुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या ३० हजारांच्या जवळपास आहे. घुग्गुस ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १७ असुन एकुण ६ वार्ड आहे.

मागील काही वर्षापासुन घुग्गुस नगरपरिषदेची मागणी आहे. घुग्गुस नगरपरिषदेच्या मागणीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली.

मागील विस वर्षात काँग्रेस व भाजपाची सत्ता राज्यात होती आता महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आहे.

घुग्गुस येथील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने काही महिण्यापुर्वी घुग्गुस शहरात घुग्गुस नगर परिषद बननार असल्याचे बँनर चौका चौकात लावले स्वतः घुग्गुस नगरपरिषदेचे शिल्पकार असल्याचे दाखविले.

पहिल्याच अधिवेशनात घुग्गुस नगरपरिषदेची घोषणा होनार व दोन दिवसात घुग्गुस नगर परिषद गँझेटवर येनार असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले तश्या वर्तमानपत्रातुन बातम्या ही प्रकाशीत करण्यात आल्या परंतु जवळपास तिन ते चार महिण्याचा कालावधी लोटुन सुद्धा घुग्गुस नगरपरिषद झाली नाही. 

घुग्गुस ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुन आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता घुग्गुस च्या जनतेला प्रश्न पडला घुग्गुस नगर परिषद कधी होणार? घुग्गुस नगरपरिषदेचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे चिन्हे दिसु लागताच नागरिकांत येणाऱ्या जानेवारी महिण्यात घुग्गुस ग्रामपंचायतीचा निवडणूका होनार अश्या चर्चा रंगु लागल्या आहे.